|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » श्रीनगरमध्ये बएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला

श्रीनगरमध्ये बएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

श्रीनगरमधल्या बीएसएफच्या 182व्या बटालियनच्य कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद तर 4 जवान जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ला करणाऱयात तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे.

पहाटे 4.303च्या सीमारास तीन दहशतवाद्यांनी कॅम्पवर हल्ला करत गोळीबार सुरू केला. या हल्ल्याची जवाबदारी जैश – ए- मोहम्मदने स्विकारली आहे. दरम्यान, श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आले होते. हल्लेखोर दहशतवादी एका इमारतीत लपले होते, पहाटेपासून दोन्ही बाजुंनी चकमक सुरू होते आसपासच्या परिसरातील शाळांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली आहे. हा हल्ला आत्मघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवादी बीएसएफ कॅम्पमध्ये घुसण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्यापैकी तिघांनाही कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. अशी माहिती बीएसएफकडून देण्यात आली.

 

Related posts: