|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संप मागे नाही, फक्त स्थगिती- सुजाता रणनवरे

संप मागे नाही, फक्त स्थगिती- सुजाता रणनवरे 

प्रतिनिधी/ सातारा

6500 मानधनवाढ तोंडी मान्य केली आहे, तरी जोपर्यत आम्हाला लेखी आश्वासन शासनाकडून मिळत नाही, तोपर्यत हया संपाला स्थगिती देण्यात आली आहे. असे मत महाराष्ट्र पुर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ (आयटन संलग्न) राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे यांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 6500 मानधनवाढ देणे मान्य केले असले तरी आम्हाला तोंडी आश्वासन दिले आहे. पण आम्हाला मानधनवाढीचे लेखी शासन निर्णयाचे पत्र मिळाले पाहिजे. आता दिवाळीचा सण असल्याने या संपाला स्थगिती दिली आहे. व या मानधनवाढीचा लेखी निर्णय मिळाला नाही, तर दिवाळी नंतर हा संप पुन्हा उभारणार आहोत. असे सुजाता रणनवरे यांनी सांगितले. 11 सप्टेंबर पासून अंगणवाडी सेविका व मदतनिस संपावर गेल्या होत्या. सेविकांना 10 हजार 500 तर मदतनिस यांना 7 हजार 500 रूपये मानधन वाढीची मागणी त्यांनी केली होती. पण ती वाढ न देता 6500 रूपये मानधनवाढीवर सेविकांना व मदतनिस यांना समाधान मानावे लागत आहे. अंगणवाडी कर्मचाऱयांना सेवाज्येष्ठतेनुसार लागु केलेल्या मानधनवाढ 1 ऑक्टोबर 2017 पासून लागू होणार आहे.

वाढीनंतर एकुण मानधन किती मिळणार ?

अंगणवाडी सेविकांना 0-10 वर्ष सेवा 6500 रूपये, 10-20 वर्ष सेवा 6695 रूपये, 20-30 वर्ष सेवा 6760 रूपये, 30 वर्षाहुन अधिक वर्ष सेवा 6825 रूपये.

मिनी अंगणवाडी  0-10 वर्ष सेवा 4500 रूपये, 10-20 वर्ष सेवा 4635 रूपये, 20-30 वर्ष सेवा 4680 रूपये, 30 वर्षाहुन अधिक वर्ष सेवा 4725 रूपये.

मदतनीस  0-10 वर्ष सेवा 3500 रूपये, 10-20 वर्ष सेवा 3605 रूपये,  20-30 वर्ष सेवा 3540 रूपये, 30 वर्षाहुन अधिक वर्ष सेवा 3675 रूपये

या नव्या मानधनात मार्च 2018 साली आणखी 5 टक्के वाढ केली जाणार असून, ती 1 एप्रिल 2018 सालापासून लागू केली जाईल. तर पोषण आहारासाठी आता प्रति बालक 6 रूपये मोबदला मिळणार आहेत. ही रूक्कम आधी 4 रूपये 92 पैसे एवढी होती. शासनाने 6500 रूपये मानधनवाढीला मंजुरी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना आता साडेसहा हजार मानधन वाढ मिळेल. त्यामुळे ज्येष्ठ सेविंकाना नव्या सेविंकांहून थोडेसे अधिक मानधन मिळणार आहे.

सेविकांना 10500 तर मदतनिसांना 7500 मानधनवाढीचे काय झाले ?

अंगणवाडी सेविकां व मदतनीस 11 सप्टेंबर पासून बेमुद संपावर गेल्या होत्या त्यांच्या मुळ मागण्या हया बाजुला सारत 6500 मानधनवाढ देण्यात येईल व पाच टक्के वाढ करण्यात येईल असा तोंडी निर्णय घेतला गेला आहे. या बेमुद संपाच्या खऱया मागण्या सेविकांना 10500 तर मदतनिसांना 7500 मानधन तसेच  शासकीय कर्मचाऱयाचा दर्जा देवून मानधनऐवजी पगार मिळावा. शासकिय कर्मचाऱयांना मिळणाऱयां सर्व सुविधा मिळाव्यात. प्राथमिक शिक्षिकांप्रमाणेसर्व सुट्टयांचा लाभ मिळावा. 15 ऑक्टोबर पुर्वी सर्व सेविका व मदतनीस यांना किमान 15000 रूपये राज्यशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने सेविका व मदतनीस यांच्या खात्यात जमा करावी. सर्व थकित देयके अदा करावी. अशा मागण्यासाठी संप पुकारण्यात आला होता. पण यातील कोणत्याही मागणीची दखल न घेता फक्त 1500 रूपये वाढ देण्यात आली आहे.