|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देवाचे दर्शन घडविणाऱया मुर्तिकारांना वंदन करावे

देवाचे दर्शन घडविणाऱया मुर्तिकारांना वंदन करावे 

प्रतिनिधी/ कुडचडे

मातीच्या गोळय़ाला आकार देऊन ज्यांनी आम्हाला देवाचे दर्शन घडविले त्या हातांना आणि त्या मूर्तीकरांना आपण सर्वांनी वंदन करायला हवे. अशा मुर्तिकांरांचा सत्कार करुन दयानंद कला केंद्राने फार मेठे कार्य केले आहे, असे गौरवोद्गार सांगेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी काढले.

कुडचडे दयांनद कला केंद्राने जागतिक पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने पर्यटन खात्याच्या सहकार्याने रवींद्र भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय पर्यटन महोत्सवातील गणेश मुर्तिकारांच्या सत्कार समारंभात आमदार पाऊसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर तसेच महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांनीच कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक आश्विनीताई जांबावलीकर, गोवा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर नाईक, कोषाध्यक्ष शिवाजी वस्त, सल्लागार भिकू नाईक, ज्ञानेश्वर नाईक, दत्ता सावंत, विश्वमाला नाईक, सदानंद खांडेकर, दयानंद कला केद्राचे अध्यक्ष मोर्तू नाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम भारतीय व गोमंतकीय कला व संस्कृतीच्या वारशाचे दर्शन घडविणारे आहे, हे पाहून आपल्याला खूप आनंद झाला. असे कार्यक्रम या परिसरात दरवर्षी व्हायला हवेत.

यावेळी सांगे, केपे, धारबांदोडा या तीन तालुक्यांतील ज्येष्ठ मुर्तिकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, श्रीगणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.  त्यामधये मधुकर कृ. नाईक (80) बाळ्ळी केपे, दामोदर बा. खांडेकर (75) कुडचडे, अर्जुन शं. नाईक (69) कुडचडे, पांडुरंग देसाई (78) शेळवण, कमलाकांत गावकर (98) व पांडुरंग शेटकर (59) धारबांदोडा, दिलीप च्यारी (51) शेल्डे, अशोक नाईक (55) कामराळ, सुनिल भा. नाईक (49) शिरफोड-कुडचडे, शितल आडपईकर (36), संजय नाईक (45) साकोर्डे, वसंत शेटकर (45) साकोर्डे, बाबनी च्यारी (58) धारबांदोडा, श्रीपाद शेटकर, धारबांदोडा यांचा समावेश होता.

सुरुवातीस अनिता नाईक व आनंदी नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. या सत्कार साहळय़ाचे संयोजन श्री गजानन देवस्थानचे अध्यक्ष जयकुमार खांडेकर यांनी केले होते. केंद्राचे अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला. सचिव बंटी उडेलकर यांनी गणेशचतुर्थीच्या काळात मूर्ती विसर्जनप्रसंगी ज्याप्रमाणे गाऱहाणे घालतात त्याप्रमाणे गाऱहाणे घालून या सोहळय़ाची सांगता करण्यात आली.

Related posts: