|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » बागानकडे गर्व्हनर्स सुवर्णचषक

बागानकडे गर्व्हनर्स सुवर्णचषक 

वृत्तसंस्था/ गँगटोक

मोहन बागान संघाने 37 व्या अखिल भारतीय गर्व्हनर्स सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात मोहन बागानने पार्थ चक्र संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. सामन्यातील एकमेव विजयी गोल बागानच्या क्रेमाने सातव्या मिनिटाला नोंदविला. बागानने ही स्पर्धा आतापर्यंत 10 वेळा जिंकली आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी राज्यांचे मुख्यमंत्री पवनकुमार चेमलिंग यांच्याहस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक व रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.

Related posts: