|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अ. भा. हय़ुमन राईट्स संघटना जिल्हाध्यक्षपदी अनंत पिळणकर

अ. भा. हय़ुमन राईट्स संघटना जिल्हाध्यक्षपदी अनंत पिळणकर 

कनेडी :

अखिल भारतीय ह्युमन राईट्स संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी फोंडाघाट येथील अनंत पिळणकर यांची, तर जिल्हा सचिवपदी फोंडाघाट येथीलच सखाराम हुंबे आणि सहसचिवपदी पियाळी येथील प्रकाश मडवी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ह्युमन राईट्स संघटनेचे राज्य प्रमुख अ??ड. ज्ञानेश खरात यांनी ही निवड जाहीर केली.

फोंडाघाट-कुर्ली नवीन वसाहत येथे अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे राज्य संघटक सचिव राणोजी चव्हाण यांनी तिघांनाही निवडीचे पत्र दिले. महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रभाकर पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुलदीप सरवटकर, लातूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर घोगळे आदी यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय ह्युमन राईट्स संस्था ही समाजात कायद्याचे पालन करून समाजातील दुर्बल तसेच पीडित घटकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण करण्याचे काम करते. मानवाधिकार क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने आपल्याला या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन जो विश्वास आपल्यावर टाकला आहे, तो सार्थकी लावणार असल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर अनंत पिळणकर यांनी व्यक्त केली. जिह्यात तालुकानिहाय दौरा करून सामाजिक क्षेत्रात आवड असणाऱया व्यक्तींची भेट घेणार असून लवकरच तालुकाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.