|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » अभिषेक नायरला मुंबई संघातून वगळले

अभिषेक नायरला मुंबई संघातून वगळले 

वृत्तसंस्था /मुंबई :

रणजी चषक स्पर्धेत बाद फेरी गाठण्यासाठी त्रिपूराविरुद्ध अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य असतानाच, या महत्वपूर्ण सामन्यासाठी अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला संघातून वगळण्यात आले आहे. यंदाच्या मोसमात खराब कामगिरी करणाऱया नायरला संघ व्यवस्थापनाने बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपूराविरुद्ध सामन्यासाठी बुधवारी 14 सदस्यीय मुंबई संघ घोषित करण्यात आला.

सध्या गुणतालिकेत क गटात मुंबईचे 5 सामन्यात 14 गुण आहेत. आजपासून त्रिपूराविरुद्ध होणारा मुंबईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यात विजय मिळवत मुंबईचा बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे, मुंबईचा स्टार फलंदाज असलेल्या नायरची यंदाच्या सत्रातील कामगिरी खराब राहिली आहे. यंदाच्या सत्रात त्याला केवळ 8 बळी मिळवता आले आहेत. त्रिपूराविरुद्ध लढतीत संघ व्यवस्थापनाने नायरला वगळले असून विजय गोहिल व मिनाद मांजरेकर या गोलंदाजाना संघात स्थान दिले आहे.  आदित्य तरेकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवले आहे.

मुंबई रणजी संघ – आदित्य तरे (कर्णधार), जय बिस्ता, पृथ्वी शॉ, सिध्देश लाडे, आकाश पारकर, कर्ष कोठारी, धवल कुलकर्णी, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, मिनाद मांजरेकर, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर व सुफियान शेख.