|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे.उत्तर कोरियाने मंगळवारी मध्यरात्री जपान समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणस्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. अमेरिकन सरकारमधील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्योंगान प्रांतातील प्यांगयांगपासून पूर्वेच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले.अमेरिकी सैन्यांनाही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान,उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी ही संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी सांगितले आहे,यापूर्वी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, “या प्रकरणात आपण लक्ष घालू’,असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.