|Friday, February 28, 2020
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्र केसरी गटाच्या लढती आजपासून

महाराष्ट्र केसरी गटाच्या लढती आजपासून 

पुणे : प्रतिनिधी :

समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व   मल्लसम्राट प्रति÷ान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने 61 वी वरि÷ गट राज्य अजिंक्मयपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. स्पर्धेच्या तिस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या रंगणार आहेत. अनेक अव्वल मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या वेळी चांदीची गदा कोण उंचावणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. 

या स्पर्धेत गादी विभागात एकूण 39 मल्ल असून, माती विभागात 35 मल्ल आहेत. गादी आणि माती विभागातील विजेता मल्ल महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढतील. जळगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या वेळी या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे इतर मल्लांना चांगली संधी आहे. असे असले तरी चांदीच्या गदेपर्यंतचा प्रवास सोपा नसेल. कारण यंदाही अव्वल मल्ल या गटात सहभागी झाले आहेत. गतवषीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि पुणे जिह्याचा शिवराज राक्षे हे गादी विभागात पहिल्याच फेरीत आमनेसामने येतील. याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचा चंद्रहार पाटील याचेदेखील आव्हान इतर मल्लांसमोर असेल. चंद्रहार तिस-यांदा आपल्या गळय़ात जेतेपदाची माळ परीधान करण्यास उत्सुक आहे. 

अभिजित कटके, शिवराज राक्षे आणि चंद्रहार पाटील सुरुवातीच्या फे -यांमध्येच आमनेसामने येत आहे. त्यामुळे या तिन्ही मल्लांची कसोटी लागणार आहे. चंद्रहार पाटीलची सलामीची लढत गणेश जगतापशी होईल. लातूरचा सागर बिराजदार, बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूरचा कौतुक डाफले असे अनेक मल्ल गादी विभागातून आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. सागर बिराजदार आणि विक्रांत जाधव पहिल्याच फेरीत आमनेसामने येतील, तर सचिन येलभरसमोर अक्षय शिंदेचे आव्हान असेल. या दोन्ही लढतीतील विजयी मल्ल दुस-या फेरीत आमनेसामने येतील. तसेच माती गटातून पुणे शहरचा साईनाथ रानवडे, तानाजी झुंजारके, साता-याचा किरण भगत, बुलढाण्याचा बाळा रफीक, जालण्याचा विलास डोईफोडे यांच्यात चुरस असणार आहे. दरम्यान, गुरुवारी ब गटाच्या म्हणजे 61, 70 आणि 86 किलो गटाच्या लढती रंगल्या होत्या. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : माती विभाग – 70 किलो – दुसरी फेरी – अलिम शेख वि. वि. सागर सुरूशे, पवन माने वि. वि. चंद्रकांत खांडेबुडे, विकास तोरडमल वि. वि. तानाजी येलगुदे, महादेव कुसुमडे वि. वि. अंकुश खांडेकर, ज्ञानेश्वर पवार वि. वि. उद्धव बोकारे, अनिकेत पाटील वि. वि. रोहित धुराटे, नितीन पवार वि. वि. सुमीत अळगजे, अरुण खेंगसे वि. वि. योगेश शितोळे. माती विभाग – 61 किलो – दुसरी फेरी – धीरज गवते वि. वि. आदेश साळवी, सुनीळ मोटे वि. वि. नीलेश घरजाळे, साहिल म्हात्रे वि. वि. अतुल सज्जनवार, सूरज कोकाटे वि. वि. नीलेश मादळे, महंमद आसिफ वि. वि. अमोल, आकाश माने वि. वि. अजय वाबळे, राहुल हेगडे वि. वि. वैभव लोंढे, नीलेश पाटील वि. वि. शांताराम दिवे. गादी विभाग – 61 किलो – अमोल उन्हवणे वि. वि. अजय आवारे, प्रफुल्ल चौधरी वि. वि. फिरोज पटेल, राजू हिप्परकर वि. वि. विशाल शेंडे, प्रताप पाटील वि. वि. विशाल बोबडे. गादी विभाग – 86 किलो – दुसरी फेरी – संजय सुळ वि. वि. मयूर लोकरे, राहुल सहारे वि. वि. जीवन कांबळे, राजू दिघोळे वि. वि. चक्रधर शिंदे, सरदार सावंत वि. वि. वशीम चौधरी, सतीश पाटील वि. वि. ओमधीरजसिंग, अक्षय कावरे वि. वि. बालाजी एलगुंडे, अमोल मुंडे वि. वि. भागवद निरगुडे, विवेक नायकल वि. वि. आबेद शेख, प्रशांत म्हाप्रे वि. वि. मोशफ शेख.

Related posts: