|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » ‘त्या’ रात्री श्रीदेवी सोबत काय घडले ?

‘त्या’ रात्री श्रीदेवी सोबत काय घडले ? 

ऑनलाईन टीम / मुंबई

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबीयच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्यात आहे. 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवीचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनार त्यांचा मृत्यू बाथटपमध्ये बुडून झाला असे समोर आले, मात्र काही लोकांना अजूनही ही गोष्ट कशी घडली हे कळालीच नाही. यावर पहिल्यांदा श्रीदेवीचा नवरा बोनी कपूरने सिनेमा समीक्षक कोमल नाहटा यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. कोमल नाहटा यांनी याबाबत ब्लॉग लिहिला आहे.

बोनी कपूर यांनी कोमल नाहटा यांना दुबईतील ‘त्या’ रात्रीची संपूर्ण घटनात्मक परिस्थिती सांगितली. दुपारी साधारण 3.30 वाजताच्या जवळपास बोनी कपूर दुबईला जाण्यासाठी रवाना झाले. श्रीदेवीने फोन केला होता, त्यावेळी ते मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर लाऊन्ज एरियात बसले होते. बोनी कपूर हे श्रीदेवीला सरप्राईज देण्याच्या विचारात होते. त्यामुळे श्रीदेवीच्या त्यावेळी आलेल्या फोनवर बोनी यांनी खोटे सांगितले. बोनी म्हणाले, ‘जान, मी काही वेळ व्यस्त असेन आणि कदाचित माझा फोनही बंद होऊ शकतो. त्यामुळे काळजी करू नकोस.’ मी फ्री झाल्यानंतर आठवणीने फोन करेल, असेही बोनी यांनी श्रीदेवीला कळवले. या दरम्यान, संध्याकाळी साधारण 6.20 वाजता (दुबई वेळेनुसार) बोनी कपूर दुबईला पोहोचले. त्यानंतर ते थेट हॉटेलमध्ये गेले आणि चेक इन केले. श्रीदेवी ज्या रूममध्ये थांबली होती, त्या रूमची बनावट चावी घेतली आणि हॉटेल स्टाफला सांगितले की, बॅग वगैरे थोडय़ा वेळाने घेवून या. बोनी दुबईत येण्याचा श्रीदेवीला अंदाज होताच, असे स्वतः श्रीदेवीनेच बोनी कपूर यांना सांगितले. बोनी आणि श्रीदेवीने सुमारे अर्धा तास गप्पा मारल्यानंतर बोनी कपूरने श्रीदेवीला शॉपिंगचा प्लॅन पुढे ढकलण्यास सांगितले आणि डिनरसाठी बाहेर जाण्याबाबत विचारले. श्रीदेवीला तयार होण्यासही सांगितले. बोनी कपूर यांनी सांगितले की, ‘मी लिव्हिग रूममध्ये आलो आणि श्रीदेवी आंघोळीसाठी बाथरूममध्ये निघून गेली.’ त्यानंतर बोनी यांनी टीव्ही पाहण्यास सुरूवात केली. काही चॅनेल पाहिल्यानंतर भारत वि. दक्षिण आफ्रिका मॅच पाहत होते. यानंतर पाकिस्तान सुपरलीगच्या हायलाईट्स बघीतल्या. बोनी कपूरला लक्षात आले की, आज शनिवार असल्याने हॉटेलमध्ये गर्दी असेल. त्यामुळे लवकर जायला पाहिजेल. तेंव्ही साधारण रात्रीचे 8 वाजले असतील. बराच वेळ झाला असल्याने, बोनी यांनी लिव्हिंग रूममधून दोन वेळेस मोठय़ाने श्रीदेवीला आवाज दिला. टीव्हीचा आवाजही कमी केला, पण कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर ते बेड रूममध्ये गेले, तिथे त्यांना पाण्याचा आवाज येत होता. त्या नंतरही बोनी यांनी ‘जान… जान…’ अशा हाका मारल्या मात्र, कोणतेही उत्तर आले नाही. बोनी यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला, जो मुळात आतून बंद केलेला नव्हता. बाथटब पूर्ण पाण्याने भरला होता आणि त्यामध्ये श्रीदेवी पूर्णपणे बुडाली होती. बोनी यांनी जे पाहिले ते सत्य आहे हे मानण्यासाठी ते तयार नव्हते. त्यांचा आपल्या डोळय़ांवर विश्वास बसत नव्हता. अशा अवस्थेत श्रीदेवीला पाहून बोनी यांच्यावर जी परिस्थिती ओढावली असेल, त्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. श्रीदेवी समोर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होती. बोनी कपूर यांचे सर्वकाही हरवले होते. दोन तासांपूर्वीच बोनी पत्नीला सरप्राईज देण्यासाठी आले होते, ते एका वाईट स्वप्नामध्ये बदलले होते.