|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वाधार योजनेला 15 मार्च पर्यंत मुदत वाढ

स्वाधार योजनेला 15 मार्च पर्यंत मुदत वाढ 

न्याय विभागामार्फत सन 2016-17 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  अर्ज दाखल करण्यासाठीची अंतीम मुदत 28 जानेवारी होती. मात्र आता 15 मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहीती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी दिली. 

शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेली रक्कम संबधित विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा करण्यासाठी   डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 28 फेबुवारी अंतीम तारीख होती. मात्र अपेक्षीत अर्ज न आल्याने अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे. 15 मार्च पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावेत, या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही कवले यांनी केले आहे.