|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नोटाबंदीने नाही तर… निरव मोदीने देश ‘कॅशलेस’ केला

नोटाबंदीने नाही तर… निरव मोदीने देश ‘कॅशलेस’ केला 

मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची टिका

प्रतिनिधी / गडहिंग्लज

चार वर्षानंतरही देशातील, राज्यातील जनता ‘अच्छे दिन’ च्या प्रतिक्षेत आहे. नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील एकही खेडे कॅशलेस झाले नाही, अशी टीका करत निरव मोदीने घोटाळा करून देश मात्र ‘कॅशलेस’ केला. अशी बोचरी टिका मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी येथे बोलताना केली.

मनसेने राज्यभर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे अभियान सुरू केले आहे. यानिमित्त गडहिंग्लजच्या दौऱयावर रविवारी प्रवक्ते श्री. अभ्यंकर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, प्रभाकर कोरवी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी जिल्हय़ाचा मनसेच्या वतीने दौरा सुरू केला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन तेथील माहिती घेतली जात आहे. याची सारी माहिती पक्षाचे नेते राज ठाकरे यांना दिल्यानंतर त्यांचा राज्यभर दौरा होणार आहे. मे पासून या दौऱयाची सुरूवात होईल आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे ताकदीने उतरणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टिका केली. ‘अच्छे दिन’ खरेच आलेत का हे विचारण्याची वेळ आली असून नापास झालेले सरकार अशी टिका त्यांनी केली. शेतकऱयांचे प्रश्न, आशा स्वयंसेविकांचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. गरीबांना रेशनवरील धान्य थंब उठविल्यानंतर दिले जाते. मात्र थंबच उठत नसल्याने या गरीबांना रेशन मिळत नाही. हे कुठले डिजीटल इंडिया ? असा प्रश्न त्यांनी केला.

दौलत साखर कारखान्याच्या प्रश्नात दौलत उदासीन असल्याचे सांगत रस्ते, वीज, पाणी, वैयक्तीक गरजा, आरोग्य या साऱयावरच सरकार अपयशी ठरले आहे. अशी जोरकस टिका करत राज्यात बीकट अवस्था आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रश्नांची मालिकाच उभारली आहे. रस्त्यांची अवस्था बीकट आहे. पाण्याची अवस्थाही तीच आहे. असे असतानाही सरकार काही करत नाही. एकही मागणी मान्य होत नसल्याने जनता हैराण झाली आहे. सरकार विरूद्ध बोलले तर देशद्रोह असल्याचे सांगितले जाते. सत्ता आम्हाला द्या. आम्ही हे बदलून दाखवितो असे सांगत राज ठाकरे यांनी नेहमीच चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हटले आहे. त्यातूनच मोदी सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले.