|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नये

काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नये 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपप्रणित सरकारचा कारभार सुरळीत चालला असून काँग्रेसने सरकार स्थापनेची स्वप्ने पाहू नयेत, असे भाजपचे खासदार व प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासन कोलमडल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे, मात्र हा आरोप चुकीचा असून प्रशासन चांगल्या पद्धतीने चालल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला सरकार स्थापनेची स्वप्ने पडतात, पण तशी स्वप्ने काँग्रेसने पाहू नयेत. 2019 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही खासदार निवडून येतील, आणि केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार, असा दावा तेंडुलकर यांनी केला.