|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांचा एसबीआयला दणका

यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांचा एसबीआयला दणका 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

शेतकऱयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱया स्टेट बँकेला यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दणका दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी एसबीआयमधील सहा मसत्त्वाची खाती बंद करून बँकेसोबतचे आर्थिक व्यवहार तोडण्याची भूमिका घेतली आहे.

नियोजन, सामान्य निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, खनिकर्म, पुनर्वसन, अधीक्षक जिल्हा कार्यालय अशा सहा विभागातील शासकीय खाते सेंट्रल बँकेसह युनियन बँकेत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिह्यात एसबीआयच्या शाखांना खरिपात 571 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र त्यापैकी केवळ 51 कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाल्याने देशमुख नाराज झाले. त्यामुळेच त्यांनी कडक भूमिका घेत, शेतकऱयांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱया स्टेट बँकेला चांगलाच दणका दिला. अनेक बँका शेतकऱयांना कागदी घोडे नाचवायला सांगून जेरीस आणतात. त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाच्या फंदात पडत नाहीत. मात्र शेतकऱयांना शेतीकामासाठी पैसा आवश्यक असतो. त्यामुळे ते खासगी सावकाराच्या दारी जातात. त्याचा परिणाम शेतकरी सावकारी फासातून बाहेरच पडत नाही. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सरकारने शेतकऱयांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मात्र बँका हे कर्ज वाटपात कुचराई करत असल्याचे दिसून येते.

Related posts: