|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत ओमकार शाह देशात 28वा

वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत ओमकार शाह देशात 28वा 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील विद्यार्थी हुशार असून त्यांना शिक्षणाचे व्यासन आहे. त्यांना घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मुष्टीफ्ंढड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालय कुजिरा येथील विद्यार्थी ओमकार शाह याने अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत देशात 28 वा क्रमांक आणि रेनर कार्दोज याने देशात 212 वा क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेत गोव्यातून 28 वा क्रमांक मिळविणारा ओमकार हा पहिला असून त्यांनी राज्यस्तरावर रेकॉर्ड केला असल्याची माहिती संचालक प्रा. व्यांकटेश प्रभुदेसाई यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

रविंद्र कुडचडकर याने देशात 914 आणि अमन रिबेलो याने 1097 वा क्रमांक मिळविला. या वरील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत देशाभरातील एकूण 9 केंद्रामध्ये प्रवेश मिळणार असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी देशाबाहेर जाणार असल्याचेही प्रा. प्रभुदेसाई म्हणाले.

ओमकार याला जेईई मुख्य परीक्षेत 118 गुण, नीट परीक्षेत 720 पैकी 624 गुण मिळाले आहेत. रेनर याला नीट परीक्षेत 720 पैकी 564 गुण, रविंद्र कुडचडकर याला जेईई परीक्षेत 212, बिटसॅट परीक्षेत 306 तर नीट परीक्षेतील 568 गुणांसह जेईई ऍडव्हान्स परीक्षेत त्याने देशात 4452 वा क्रमांक मिळविला आहे. अमर रिबेलो जेईई परीक्षेत 213, बिटसॅट परीक्षेत 348, नीट परीक्षेत 564 गुण मिळवून आयआयटी जेईई परीक्षेत भारतात 2106 वा आला आहे.

ओमकार याला दिल्ली येथील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे. ‘मेडिसिन इन न्युरोसायन्स’ या विषयाचे शिक्षण घ्यायचे आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत जोधपूर किंवा भुवनेश्वर येथील संस्थेत रेनरला प्रवेश घ्यायचा असून कार्डिओलॉजी किंवा आँकोलॉजी या विषयात त्याला पदवी मिळविण्याची इच्छा आहे.

Related posts: