|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दादासाहेबांच्या नावची स्वागत कमान उभी करावी

दादासाहेबांच्या नावची स्वागत कमान उभी करावी 

प्रतिनिधी/ सातारा

आजी-माजी सैनिकांनी एकत्र येवून कॅप्टन नांगरे-पाटील उर्फ दादासाहेबांचे नाव चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या नावाची गावात ‘स्वागत कमान’ अथवा  इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ माजी सैनिक एकनाथ बाबुराव जाधव यांनी केले. 

सुमन नांगरे-पाटील यांनी संकलन केलेल्या ‘कॅप्टन नांगरे-पाटील साहेब सोनेरी सलाम! एक प्रेरणादायी जीवनगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोनगाव तर्फ सातारा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात शानदार करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सरपंच पांडूरंग नावडकर, सेवानिवृत्त सुभेदार हणमंत नावडकर, एकनाथ जाधव, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव, शकुंतला जाधव, सुमनताई उत्तमराव नांगरे-पाटील, चंद्रसेन जाधव, मयुरी जाधव, माजी सैनिक महिपती नावडकर, बबन जाधव, अर्जुन जाधव, परशुराम नावडकर, उत्तम बर्गे, आनंदराव हेळकर, सर्जेराव नांगरे-पाटील, श्रीराज हेळकर, राजवीर हेळकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरपंच नावडकर यांनी केले. अशोक नावडकर यांनी आभार मानले.

Related posts: