|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » शून्य गुण, तरीही होणार डॉक्टर

शून्य गुण, तरीही होणार डॉक्टर 

नवी दिल्ली

 2017 मध्ये पार पडलेल्या ‘नीट’मध्ये शून्य गुण मिळून देखील 110 विद्यार्थ्यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविलेल्या सुमारे 400 विद्यार्थ्यांना एक अंकी गुण मिळाले होते. शून्य गुण मिळून देखील हे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरल्याने शिक्षण क्षेत्राचा काळाकुट्ट चेहरा उघडकीस आला आहे. नीटमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे विषय असतात आणि प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.

नीटच्या माध्यमातून वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतलेल्यांपैकी 1990 जणांना 720 पैकी 150 पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा या दोन्ही विषयांमध्ये 530 उमेदवार हे एक अंकी गुण, शून्य गुण प्राप्त करणारे आहेत. या 530 पैकी 507 जणांनी खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. या सर्वांनी भरलेले वार्षिक शुल्क सुमारे 17 लाख रुपये इतके आहे. 530 मधील निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे अभिमत विद्यापीठात शिकत आहेत.  नीटमध्ये 0 गुण मिळविणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन सर्वसामान्यांवर उपचार करणार असतील तर आरोग्य सुधारणार की आणखीन बिघडणार देवच जाणे.

Related posts: