|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्नांवर चर्चा

कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्नांवर चर्चा 

वार्ताहर / कसबा सांगाव

कागल-हातकणंगले पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रलंबित विषयांवर उद्योजक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. मॅक असोसिएशनच्या राम प्रताप झंवर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेंत लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते त्वरित करण्यात यावेत, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करावा, रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेली झाडे-झुडपांची स्वच्छता करावी, रेमंड, फ्रॉस्ट्री आणि किर्लोस्कर चौक येथे हायमास लावण्यात यावेत, रस्त्याच्या मध्यभागी आणि बाजूस बंद असलेले पथदीवे त्वरित सुरु करावेत, वीज बचतीसाठी एलईडी बल्ब बसवावेत, वेस्ट वाळू टाकण्यासाठी भूखंड मिळावा, आदी मागण्या केल्या.

बैठकीस मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, कार्यकारी अभियंता दिलीप काकडे, उपअभियंता सुभाष मोरे, एस. व्ही. अपराज, नवले, एकनाथ पाटील, गोरख माळी, संजय पेंडसे, सुरेश क्षीरसागर,मोहन  कुशिरे, विठ्ठल पाटील, कुमार पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.