|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत

सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबीत 

ऑनलाईन टीम / रेवाडी :

हरियाणातील रेवाडीमध्ये 19वर्षीय तरूणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. . याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र आता टॉपर बलात्कार प्रकरणी एका महिला पोलीस अधिकाऱयाला निलंबीत करण्यात आलं आहे. पोलीस उप-अधिक्षक हिरामणी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यामध्ये वेळ वाया घालवण्यात आला, त्यामुळे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जातं आहे.

 

बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी नीशूला पोलिसांनी अटक केल्याची माहिती याआधी पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने 30 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली. दीनदयाल आणि डॉ. संजीव यांचा यामध्ये समावेश आहे. तर मुख्य आरोपी नीशूलाही पकडण्यात यश आले होते.

 

Related posts: