|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचे उपोषणादरम्यान निधन

ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचे उपोषणादरम्यान निधन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जे÷ पर्यावरणवादी प्रोफेसर जी.डी अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांचे उपोषणादरम्यान निधन झाले आहे. गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या 111 दिवसांपासून ते उपोषण करत होते. पोलिसांनी उपोषणस्थळावरुन उचलल्यानंतर त्यांनी जलत्याग केला होता. हरिद्वारमधील ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात प्रा. अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला.

गंगा नदी परिसरात अवैध खाणकाम, धरणे, गंगेची स्वच्छता अशा गंगेसंबंधित विविध मुद्यांवर प्रा. जी. डी. अग्रवाल 22 जून 2018 पासून उपोषणाला बसले होते. त्यांनी गंगेच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध मुद्दे अनेकदा सरकार दरबारी सुद्धा मांडले होते. याच वषी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंगेसाठी वेगळा कायदा बनवण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र कुठूनच योग्य प्रतिसाद न आल्याने त्यांनी 22 जूनपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती. मात्र गंगेसाठी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी घेतली होती. याआधीही प्रा. जी. डी. अग्रवाल गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषणावर बसले होते. 2012 सालीही त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी मागण्यांवर सरकारने सकारत्मक भूमिका घेतल्याने प्रा. अग्रवाल यांनी उपोषण मागे घेतले होते.