|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पी.व्ही.लोहार यांना आदर्श कृतीशील कलाशिक्षक पुरस्कार

पी.व्ही.लोहार यांना आदर्श कृतीशील कलाशिक्षक पुरस्कार 

वार्ताहर /वडणगे :

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीमार्फत देण्यात येणारा सन 2018-19 चा आदर्श कृतीशील कलाशिक्षक पुरस्कार देऊन पी. व्ही. लोहार यांना गौरवण्यात आले. पी. व्ही. लोहार हे कै. ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूल भुये, ता. करवीर येथे मुख्याध्यापक व कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शाळेमध्ये सामाजिक, शैक्षणिक इतर विषयांवर विविध उपक्रम राबवून समाजप्रबोधन केले आहे. यापूर्वीही त्यांच्या कामाची दखल घेऊन विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

याचीच दखल घेऊन महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

याकामी संस्थेचे सचिव भारत पाटील (भैया), मुख्याध्यापक संघाचे संचालक रविंद्र मोरे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन मिळाले.