|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

या सप्ताहात महत्त्वाच्या कामांना आधी पूर्ण करा. सूर्य लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात नेटाने प्रयत्न करा. लोकसंग्रह वाढवता येईल. मैत्री वाढेल. धंद्यात काम मिळेल. नोकर माणसांच्याकडून प्रेमाने काम करून घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात नाव होईल. पैसा मिळेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. यश येईल. संसारातील समस्या रेंगाळत ठेवू नका. मुले प्रगती करतील.


वृषभ

 अडचणीवर मात करून यश मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. बुध, गुरु युती, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. संसारात तडजोड स्वीकारावी लागेल. जवळच्या वृद्ध माणसांची काळजी घ्यावी लागेल. वाटाघाटीत तणाव होऊ शकतो. राजकीय- सामाजिक कार्यात गर्वि÷पणाने वागू नका. कोर्टकेसमध्ये पैसे देऊन काम होईल, असे समजू नका. कला, क्रीडा क्षेत्रात संयम ठेवा. खाण्याची काळजी घ्या.


मिथुन

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात यश येईल. प्रति÷ा मिळेल. तुमचे स्थान भक्कम करा. संसारात सुखद समाचार मिळेल. धंद्यात वाढ होईल. नोकरांची कमतरता होऊ शकते. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रतिमा उजळेल. पैसा मिळेल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आळस करू नये.


कर्क

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, गुरु युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना वेग येईल. लोकांना खूष ठेवता येईल. धंद्यात जम बसेल. थकबाकी मिळवा. संसारात आनंदाची बातमी मिळेल. जमिनीसंबंधी काम लवकरच करून घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. नोकरीत बदल करता येईल. कोर्टकेसमध्ये  सोमवार, मंगळवार सावध रहा. रागावर ताबा ठेवा.


सिंह

चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्यचंद्र लाभयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. दौऱयात यश येईल. लोकांचे, नेत्यांचे सहकार्य मिळेल. ठोस कामगिरी करा. घरातील ताण कमी होईल. धंद्यात काम मिळेल. नोकर वर्गाशी चांगल्या शब्दात  बोला. नोकरी लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये बुधवार, गुरुवार सावध रहा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.


कन्या

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, बुध गुरु युती होत आहे. फालतू गोष्टीत, व्यसनात वेळ फुकट घालवू नका. तुमच्या कामाकडे लक्ष द्या. पैसा मिळवा. धंदा वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ तुमचे कौतुक करतील. लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांची कामे करा. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेसमध्ये यश येईल. शुक्रवारी सावध रहा. कायदा पाळा.


तुळ

रविवारी किरकोळ तणाव होईल. दगदग होईल. वाहन जपून चालवा. बुध, गुरु युती, शुक्र हर्षल प्रतियुती होत आहे. संसारातील वाद कमी होईल. नोकरी मिळेल. प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याकडे लोक, वरि÷ आकर्षित होतील. समाजकार्य करत रहा. धंद्यातील समस्या कमी होतील. कर्जाचे काम होईल. कला, क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. शेअर्समध्ये लाभ होईल. कोर्टकेस जिंकता येईल.


वृश्चिक

बुध, गुरु युती, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. नम्रता ठेवा. तुमचे कठोर बोलणे सर्वत्र ठिकाणी त्रासदायक ठरेल. वाद वाढेल. धंद्यात कष्ट घ्या. तुमचा अंदाज चुकेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. जवळचे लोक तुम्हाला कमी लेखण्याची शक्मयता आहे. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. कोर्टकेसमध्ये मुद्याचेच बोला. योग्य सल्ला घ्या.


धनु

चंद्र,शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. कोणत्याही कामात अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येईल. जिद्द ठेवा. धंद्यात वाढ होईल. पैसे कुणाच्याही हातात देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तत्पर रहा. लोकांच्या अडचणी समजून घ्या. काम करा. बेसावध राहू नका. कष्ट घ्या. तरच टिकाल. कोर्टकेसमध्ये बुधवार, गुरुवार सावधपणे बोला. मुलांनी अभ्यासात आळस करू नये.


मकर

या सप्ताहात अडथळे निर्माण होतील. राजकीय, सामाजिक कार्यात जिद्दीने काम करावे लागेल. मन अस्थिर राहील. रागावर नियंत्रण ठेवा. बुध, गुरु युती, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे.  धंद्यात वाढ करता येईल. थकबाकी मिळवा. कला,क्रीडा  क्षेत्रात चांगले काम मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. घरात संमिश्र वातावरण राहील. महिलांनी दिवाळीची तयारी करतांना काळजी घ्यावी. कोर्टकेस सरस ठरेल.


कुंभ

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, बुध, गुरु युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यांत गैरसमज दूर करता येईल. प्रति÷ा मिळेल. लोकांच्यासाठी चांगले कार्य करा. यश येईल. बुधवार, गुरुवारी प्रवासात सावध रहा. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार कराल. कोर्टकेस जिंकता येईल. परीक्षेत यश येईल.


मीन

बुध, गुरु युती, शुक्र,हर्षल प्रतियुती होत आहे. घरगुती समस्या येतील. वाद वाढेल. सौम्य धोरण राजकीय, सामाजिक कार्यात ठेवा. अहंकाराने नुकसान होईल. मैत्रीत गैरसमज होईल. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्ग कमी पडू शकतो. शुकवार, शनिवारी अडचणी वाढतील. व्यसनाच्या नादी लागू नगा. कला, क्रीडा क्षेत्रात सहनशीलता ठेवा. कोर्टकेसमध्ये कमी पण योग्य बोला. खिसा पाकीट सांभाळा. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या.

Related posts: