|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » येत्या 12 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

येत्या 12 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवषी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवयावषी बुधवार 12 डिसेंबर ते रविवार 16 डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे 66 वे वर्ष असून यावषीच्या महोत्सवात कला प्रस्तुती करणाऱया कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

येत्या 12 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, पृथ्वी एडिफिसचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अभय केले, आशा पब्लीसिटीचे चंद्रकांत कुडाळ, बुलडाणा अर्बनचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक शिरीष देशपांडेया वेळी उपस्थित होते. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास फिनोलेक्स, धृतपापेश्वर लि., पु. ना. गाडगीळ ऍण्ड सन्स, युनियन बँक,नांदेड सिटी, बुलडाणाअर्बन, गोखले कन्ट्रकशन्स, पृथ्वी एडीफीस, सुहाना मसाले, आशा पब्लिसिटी आणि इंडियन मॅजिक आय यांचे सहकार्य लाभले आहे. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल 31 कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचा देखील सहभाग असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली. बुधवार 12 डिसेंबर या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी 3 ते रात्रौ 10 अशी महोत्सावाची वेळ असेल. गुरुवार 13 डिसेंबर व शुक्रवार 14 डिसेंबर रोजी महोत्सवाला दुपारी 4 वाजता सुरूवात होईल तर रात्रौ 10 वाजेपर्यंत महोत्सव सुरु राहील. शनिवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होईल व आधीच परवानगी मिळाल्याने महोत्सव रात्रौ 12 पर्यंत चालेल. रविवार 16 डिसेंबर हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून त्यादिवशी दुपारी 12 ते रात्रौ 10 या वेळेत महोत्सव पार पडेल. महोत्सवाच्या जागा बदलाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, यावषी महोत्सव हा नवीन जागेत होणार आहे त्यामुळे आम्हालाही औत्सुक्मय आहे. शास्त्रीय संगीताचे पावित्र्य जपत केलेल्या नवनवीन प्रयोगांना रसिक श्रोत्यांनी आतापर्यंत भरघोस प्रतिसाद आणि दाद दिली आहे. त्यामुळे या वषीच्या महोत्सवाचा बदल स्वीकारत पुणेकर आणि देशविदेशातून येणारे रसिक श्रोते यावषीही सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाठीशी उभे राहतील असा आमचा विश्वास आहे.