|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी करण्यास हायकोर्टाचा नकार

मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी करण्यास हायकोर्टाचा नकार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाविरोधत न्यायालयात धव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत वकिलासह याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकरर्त्यांना दिली आहे. त्यामुळे तीन वाजता कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

मराठा आरक्षण कायद्याविरोधत करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाहीर करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. तसंच एखाद्या समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधनाच्या तरतुदींविरोधत असल्याचं सांगत, ऍड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली. यामुळे सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे.ऍड.सदावर्ते यांनी 3 डिसेंबर रोजी ही याचिका हायकोर्ट रजिस्ट्रारकडे सादर केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक लॉजिंग नंबरही मिळाला आहे.