|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » वडिलांना टाटा करणे पडले महागात ; तिसऱया मजल्यावरून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू

वडिलांना टाटा करणे पडले महागात ; तिसऱया मजल्यावरून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिकच्या ‘शिरीन हाईट्स’मधून तिसऱया मजल्यावरील गॅलरीतून वडिलांना टाटा करतांना साडेतीन वर्षांचा अंशुमन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले. साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा करुन तो गॅलरीतच खेळत बसला. दुसरीकडे त्याची आई टीव्ही बघण्यात दंग होती. तेवढय़ात गॅलरीत खेळता खेळता अचानक अंशुमनचा तोल गेला आणि तो तिसऱया मजल्यावरून खालीगेटवर पडला. डोक्मयाला लागल्यामुळे अंशुमनचा मृत्यू झाला. शर्मा कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी अंबडच्या शिरीन हाईट्समधील नव्या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. मात्र त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीला बसवण्यात आलेला लोखंडी कठडा कमी उंचीचा होता आणि हेच अंशुमनच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. घराच्या बाल्कनीतून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू होण्याची नाशिकमधील तिसरी घटना आहे.

Related posts: