|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर कोरियाचा मुत्सद्दी इटलीत लपलाय : दक्षिण कोरिया

उत्तर कोरियाचा मुत्सद्दी इटलीत लपलाय : दक्षिण कोरिया 

सेऊल :

उत्तर कोरियाच्या एक वरिष्ठ मुत्सद्दी इटलीत लपला असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या एका खासदाराने गुरुवारी दिली. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱयांसोबत बैठक घेतल्यावर त्यांनी पत्रकारांनी ही माहिती दिली. प्रभारी राजदूत जो सॉन्ग गिल यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आला होता, परंतु त्यापूर्वीच दूतावास परिसरातून ते निघून गेले होते असे खासदार किम मिन की यांनी सांगितले.

जो यांनी पाश्चिमात्य देशात स्वतःच्या कुटुंबासाठी आश्रय मागितल्याचे उत्तर कोरियाचे वृत्तपत्र जूंगआंग इल्बोने वृत्त दिले होते. या वृत्तानंतर दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेने स्वतःच्या खासदारांनी याबद्दलची माहिती दिली.

48 वर्षीय जो हे ऑक्टोबर 2017 पासून रोममध्ये प्रभारी राजदूत म्हणून कार्यरत होते. त्यांच्यापूर्वी राजदूत राहिलेले मून जेंग नेम यांना उत्तर कोरियाने आण्विक चाचणी घेतल्यावर इटलीने हाकलले होते. उत्तर कोरियाच्या बहुतांश मुत्सद्यांना विदेशात सेवा देण्यापूर्वी स्वतःच्या कुटुंबातील मुलांना मायदेशीच सोडून द्यावे लागते.