|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण

लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.
अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथील आपल्या गावी आजपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषणास बसणार आहेत. यावेळी अण्णा हजारे म्हणाले, ‘हे माझे  उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलो आहे. हे त्याच प्रकारचे  आंदोलन आहे.’ 

लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. याविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही.’ 

Related posts: