|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साक्षी प्रभुणेचे साहस मुलांसाठी प्रेरणादायी

साक्षी प्रभुणेचे साहस मुलांसाठी प्रेरणादायी 

प्रतिनिधी/ वाई

ट्रेकींग या साहसी क्रीडा प्रकारात लोणावळा येथील अवघड तैलबैला या कातळ डोंगरावर ट्रेकींगव्दारे चढाई करून साक्षी माधव प्रभुणे हिने लहान मुले व युवतींसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ट्रेकींगमधील तिचे साहस कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांनी व्यक्त केले.

सातारा येथील साक्षी माधव प्रभुणे हेने ट्रेकींगमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करताना लोणावळा येथील तैलबैला ही कठीण डोंगर चढाई यशस्वीपणे पार केली. त्याबद्दल तिला बँकेच्यावतीने अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे यांच्या हस्ते मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी दि वाई अर्बन बँकेचे संचालक विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, डॉ. शेखर कांबळे, संचालिका गीता कोठावळे, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, सहाय्यक सरव्यवस्थापक  प्रसाद कुंभारे, व्यवस्थापक माधव प्रभुणे, गुरूदेव तारू, वृंदा प्रभुणे आदी उपस्थित होते.

साक्षी प्रभुणे हिने ट्रेकींगमध्ये केलेल्या साहसाबाबतची माहिती संचालक डॉ. शेखर कांबळे यांनी दिली. मनाली येथील माऊंटेनेरिंग स्पर्धेतही तिने सहभाग नोंदविला आहे. तिच्या ट्रेकींगबाबतच्या साहसाला तोड नाही. तिच्या यशाबद्दल दि वाई अर्बन बँकेने तिचा गौरव केला आहे. तिचे वडील माधव प्रभुणे बँकेत अधिकारी आहेत. आई वृंदा प्रभुणे या गृहिणी आहेत.

 

Related posts: