|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता ; ईमेलने खळबळ

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता ; ईमेलने खळबळ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा म्हणजेच ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्हातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच पुतळय़ावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचे एका ईमेलद्वारे समोर आले आहे.

   ईमेलद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील तीर्थस्थाने आणि रेल्वे स्टेशन्सवर हल्ला करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या ईमेलची गंभीर दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रान्च आणि ऍन्टी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) ला याबाबत तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ईमेलची सत्यता पडताळली जाणार आहे. दरम्यान, या ईमेलनंतर नर्मदेच्या तीरावर असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.