|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » “हिंमत असेल तर माढ्यातून लढाच”, अजित पवार यांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

“हिंमत असेल तर माढ्यातून लढाच”, अजित पवार यांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान 

ऑनलाईन टीम /  पिंपरी चिंचवड: 

 “कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केले  नाही तर नाव सांगणार नाही,” असे खुले  आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले. पिंपरी चिंचवडमधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

“चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेला, कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला द्यायला निघाले आहेत. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळा, ती व्यवस्थित कशी राहिल हे पाहावे. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात असेल हिंमत तर त्यांनी माढ्यातून लढावे. नाही चितपट केले तर नावाचे  सांगणार नाही,” असे  आव्हान अजित पवार यांनी दिले.

Related posts: