|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर ;पार्थ पवार, अमोल कोल्हे यांना उमेदवारी

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर ;पार्थ पवार, अमोल कोल्हे यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

आगामी लोकसभा निवडणीकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून पार्थ पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पार्थ हे मावळ मतदार संघातून निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर नुकतेच पक्षप्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

गुरूवारी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यात मावळ , माढा, बीड व अहमदनगरच्या जागेचे गूढ कायम होते. त्यानंतर आज सहा जागांसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अहमदनगर आणि माढाची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

उमदेवारांची नावे

मावळ :  पार्थ पवार

नाशिक : समीर भूजबळ

दिंडोरी : धनराज महाले

शिरूर : अमोल कोल्हे

बीड  : बजरंग सोनवणे