|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » प्राप्तिकर विभागाकडून अर्ज-16च्या रचनेत बदल

प्राप्तिकर विभागाकडून अर्ज-16च्या रचनेत बदल 

सदरचा अर्ज सादर करणाऱयांना अधिकची माहिती द्यावी लागणार

नवी दिल्ली

 केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून अर्ज-16 च्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. हा अर्ज सादर करणाऱया नियुक्तदाराला आता त्यांच्या कर्मचाऱयांची अधिकची माहिती द्यावी लागणार आहे. त्यात कर्मचाऱयांची मालमत्तामधून होत असणारी कमाई, त्याला दुसऱया नियुक्तदाराकडून मिळणारे उत्पन्नाची सविस्तर माहिती आदीचा समावेश अर्ज-16मध्ये द्यावी लागणार आहे. यामुळे करचोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

नवीन अर्ज-16 मध्ये वेगवेगळे कर, बचत करण्याच्या योजनांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक आणि त्यांच्याशी संबंधीत असणारी रक्कम कपात, कर्मचाऱयांना मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि अन्य स्त्रोतापासून जमा होणारे उत्पन्न यांचा ही यात समावेश करण्यात येणार आहे.

12 मेपासून अर्ज-16 लागू  करणार

आयकर विभागाद्वारे संशोधित अर्ज-16 चालू वर्षातील 12 मेपासून लागू करण्यात येणार आहे. म्हणजे वित्त वर्ष 2018-19चे रिटर्न संशोधित अर्जाच्या आधारावरच हा अर्ज भरावा लागणार आहे.

नियुक्तीदार आपल्या कर्मचाऱयांचे वित्त वर्ष समाप्त झाल्यानंतर अर्ज-16 सादर करत असतात. त्यात कर्मचाऱयांचा टीडीएसची माहिती असते. आणि अर्ज-16 च्या आधारावर कर्मचारी आपले रिटर्न भरत असातात. नियुक्तदार मात्र नेमक्यावेळी जूनमध्ये प्राप्तिकर रिटर्न अर्ज-16 सादर करत असतात.

अर्ज बदलाचा काय होणार परिणाम?

रिटर्न फायलिंगच्या स्टॅडर्डारझायशेनसाठी अर्ज-16 मध्ये बदल करण्यात आला आहे. काही वेळा आणि रिटर्न फाईलमध्ये आकडेवारीत मोठी तफावत पहावयास मिळते. परंतु अर्ज-16 मधून कर्मचारी गुंतवणूक आणि नफ्याची सर्व माहिती दिल्यानंतर त्यात ही तफावत आढळणार नाही.

भत्त्यांवरील कर सवलत

काही मिळणाऱया भत्त्यांवर करात सवलत मिळत असते, ती मिळत राहणार  आहे नियुक्तदार आपल्या कर्मचाऱयाला मिळणाऱया सर्व कपातीवर संपूर्ण ब्यूरो अर्ज-16 मध्ये द्यावी लागणार.

अर्ज-24 मध्ये बदल

नियुक्तादार प्राप्तिकर विभागाला हा अर्ज देते. यामध्ये सर्व गैरव्यवहारातील पॅनचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यात कर्मचाऱयांने खर खरेदी केल्यास त्यात कर्ज घेतले असले तरीही तपशील द्यावा लागणार आहे. यातल 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर रिटर्न फाईल करावी लागणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

खालील घटकांना मिळते

करात सवलत

? दैनंदिन मिळणारे भत्ते

? प्रवासी भत्ता

? शैक्षिणिक शुल्क

? येण्याजाण्याचा खर्च

? हेल्पर भत्ता

? युनिफॉर्म भत्ता

? मोबाईलसह अन्य भत्ते करारामध्येच मोजले जाणार