|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सर्व्हे करून नाल्याची खोदाई करा

सर्व्हे करून नाल्याची खोदाई करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून नाल्याची खोदाई होत आहे. पण ही खोदाई योग्यप्रकारे होत नाही. सर्व्हे करून खोदाई करणे गरजेचे होते. काही ठिकाणी 4 फूट तर काही ठिकाणी 8 फूट अशी खोदाई सुरू आहे. तेव्हा ही खोदाई थांबवून सर्व्हे करून त्यानंतर खोदाई करावी, अशी मागणी मण्णूरवासियांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काही मोजक्मया शेतकऱयांच्या शेतामध्ये अतिक्रमण होत आहे. मण्णूर गावातील व शेतवडीतील पाणी मार्कंडेय नदीला जाते. त्या नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्रत्यक्ष अधिकाऱयांनी भेट देऊन हा सावळा गोंधळ दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकार पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आता नदी-नाल्यांमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.

पाणी समस्याही गावामध्ये गंभीर बनली आहे. पाणी नसल्याने मण्णूर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 10-12 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. तेव्हा टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी पुंडलिक तरळे, देवाप्पा चौगुले, नागव्वा परशराम सुळगेकर, अनिता नाईक, विमल पाटील, लक्ष्मी नाईक, कृष्णा देवरमनी यांच्यासह नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या..