|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » आंतरराष्ट्रीय वित्त निगम मणप्पुरम फायनान्समध्ये करणार गुंतवणूक

आंतरराष्ट्रीय वित्त निगम मणप्पुरम फायनान्समध्ये करणार गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

आंतरराष्ट्रीय वित्त निगम(आयएफसी) बिगर बँकिंग वित्तिय कंपनी मणप्पुरम फायनान्समध्ये 3.5 कोटी डॉलर्स(240 कोटी रुपयाहून अधिक)ची गुंतवणूक करणार आहे. आयएफसी विश्व बँकेची एक शाखा आहे. आयएफसी आणि मणिप्पुरम फायनान्स यांनी सयुक्तपणे यांची घोषणा केली आहे. सदरची गुंतवणूक केल्यावर कमी उत्पादन असणाऱया परिवारांना लहान मध्यम आणि अवजड उद्योग तसेच सोने कर्ज यांतील विस्तार वाढविण्यास मोठी मदत यातून होणार असल्याचे म्हटले आहे.

जागतिक बँकेमधील एक विभाग म्हणून आफएफसी मणप्पुरम फायनान्स 3.5 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याने सोने तारण यावरील कर्जांशी संबंधीत जोडले जाणारे बिगर बँकिंग वित्तीय कंपनीमधील ही पहिलीच इतकी मोठी गुंतवणूक असणार आहे. यामाध्यमातून देशाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासोबतच नवीन वित्तीय रणनिती आखण्याचे ध्येय यातून ठेवण्यात येणार असल्याचे निश्चित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ध्येय विकासाचे

आम्ही सोन्याच्या बदल्यात कर्ज देणारी वित्तिय कंपनी प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. यातून गरीब आणि गरजू लोकांना रोजगार निर्मिती अन्य टप्प्यातील मार्ग उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे भारतातील आयएफसीचे विभागीय प्रमुख जुन झांग यांनी म्हटले आहे.

 

Related posts: