|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » क्रिकेटपटू रिंकू सिंगवर तीन महिन्यांची बंदी

क्रिकेटपटू रिंकू सिंगवर तीन महिन्यांची बंदी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

उत्तरप्रदेशचा डावखुरा क्रिकेटपटू रिंकू सिंगवर भारतीय क्रिकेट मंडळाने तीन महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अबुधाबीमध्ये टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रितसर परवानगीशिवाय रिंकू सिंगने सहभाग दर्शविल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रिंकू सिंगला भारत अ संघात स्थान मिळू शकणार नाही.

रिंकू सिंगच्या निलंबनाच्या मुदतीला 1 जून पासून प्रारंभ होणार आहे. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण विंडीजमध्ये होणाऱया कॅरेबियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपले नाव राज्य क्रिकेट संघटनेच्या परवानगीशिवाय पाठविले होते पण शेवटच्याक्षणी इरफान पठाणने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तथापि भारतीय क्रिकेट मंडळाने इरफान पठाणला सक्त ताकीद दिली आहे. तसेच मॉरिशसमध्ये होणाऱया टी-20 लीग स्पर्धेत भारताच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघाचा माजी कर्णधार अनुज रावतने मान्यतेशिवाय सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता पण त्याच्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने कोणतीच कारवाई केली नाही. गेल्या दोन आयपीएल हंगामात रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related posts: