|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » एमएचटी-सीईटीत अमरावतीचा सिद्धेश, मुंबईची किमया प्रथम

एमएचटी-सीईटीत अमरावतीचा सिद्धेश, मुंबईची किमया प्रथम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल 99.98 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेला 20 हजार 930 विद्यार्थी गैरहजर राहिले. सोमवारी मध्यरात्रीपासून हे निकाल संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.

Related posts: