|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पावसानेही बच्चे कंपनीबरोबरच सुरू केला श्रीगणेशा

पावसानेही बच्चे कंपनीबरोबरच सुरू केला श्रीगणेशा 

   डिचोली/प्रतिनिधी :

   2019 सालाच्या शालेय वर्षाच्या प्रारंभीच दमदारपणे पडलेल्या पावसाने विद्यार्थी वर्गाबरोबरच पालकवर्गालाही सुखावले. शालेय वर्षाच्या प्रारंभीच पावसानेही आपला या मोसमाच्या “श्रीगणेशाला” प्रारंभ केल्याचे अनेक पालकांनी बोलून दाखविले. गेले अनेक दिवस असह्य उकाडय़ामुळे त्रस्त बनलेल्या लोकांना गारवा अनुभवण्याची संधी पावसाने दिली. व ऐनवेळी शाळा सुरू होण्याच्या वेळीच पाऊस आल्याने विद्यार्थ्यांनीही मजेत शाळा हायस्कूल गाठले.

   डिचोली तालुक्मयातील राज्याबरोबरच शाळा, हायस्कूलना सुरूवात झाली. नवीन जुन्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जुन्या नवीन वर्गमित्रांबरोबर शाळा हायस्कूलात आगमन केले. गेले सुमारे दिड महिनाभर सुन्न असलेले शाळा हायस्कूलचे परिसर गजबजलेले दिसून आले. त्याचबरोबर रस्ते, बसस्थानक, बाजार यामध्येही विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ दिसून येत होती.

   नव्यानेच शिक्षणाला सुरूवात करणाऱया अनेक लहान मुलांच्या पालकांनी आपापल्या पाल्यांना पहिल्याण दिवशी शाळेत तसेच शिशुवाटीका, प्ले स्कछल यामध्ये पोहोचविण्यासाठी गर्दी केली होती. नव्यानेच शालेय कारकीर्द सुरू करणाऱया लहान मुलांना सावरतानाही अनेक पालक दिसत होते. तर नवीन मुलांना समावून घेताना शिक्षक वर्गाला मोठी कसरत करावी लागत होती.

  शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ आला तरीही पावसाचा पत्ताच नसल्याने कदाचित शालेय वर्षाला जरा उशीर प्रारंभ होण्याची शक्मयता सर्वत्रच वर्तवली जात होती. मात्र शिक्षण खात्याने शालेय वर्षाला गुरू. दि. 6 जून पासूनच प्रारंभ होत असल्याचे जाहीर केल्याने पालकांचा संभ्रम दुर झाला होता. त्यात पावसाने शाळा सुरू होण्यापूर्वी उपस्थिती लावून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यामुळे शालेय वर्षाला सुरूवात होण्यासारखे वातावरण सर्वांनी अनुभवले. मुलांनीही पावसाळी वातावरणात दिमाखात शाळा, हायस्कूले गाठली.

Related posts: