|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम बेकायदा

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम बेकायदा 

मुख्याधिकाऱयांकडून नोटीस : कार्यालयच नसल्याने नोटीस मागे

वार्ताहर / कणकवली:

कणकवली न. पं. च्या आरक्षण क्र. 53 या जागेमध्ये बांधकाम करण्यात येत असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या इमारत बांधकामाला कणकवली मुख्याधिकाऱयांनी अनधिकृत ठरवत नोटीस काढली आहे. नगररचना सहाय्यक मयुर शिंदे यांनी केलेल्या पाहणीत या आरक्षित जागेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा अहवाल मुख्याधिकाऱयांना दिला होता. मात्र, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरच्या पत्त्यावर न. पं. ने पोष्टाने पाठविलेली ही रजिस्टर नोटीस त्या पत्त्यावर संबंधित संस्था कार्यालय नसल्याने परत मागे आल्याची माहिती न. पं. चे अधीक्षक भाई साटम यांनी दिली.

कणकवली न. पं. च्या मंजूर शहर विकास आराखडय़ातील सर्व्हे नं. 128 पैकी 105, 133 या क्षेत्रात प्राथमिक शाळेचे आरक्षण मंजूर आहे. मात्र, या क्षेत्रात न. पं. मार्फत कोणतेही बांधकाम मंजूर नाही. या अनधिकृत बांधकामाबाबत नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी 14 मे 2019 रोजी केलेल्या तक्रारीनुसार, नगररचना सहाय्यक शिंदे यांनी सदर बांधकामाची पाहणी करून त्याबाबत सदर बांधकाम अनधिकृत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार या अनधिकृत बांधकामाला न. पं. मार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 53 नुसार नोटीस देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच या नोटिशीची एक प्रत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांनाही पाठविण्यात आली आहे.

. पं. कडे परवानगीचा प्रस्ताव!

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस काढल्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडून त्या बांधकामाला परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव न. पं. कडे आल्याची माहिती मयूर शिंदे यांनी दिली.

Related posts: