|Thursday, December 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत मंगेश देसाई

कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत मंगेश देसाई 

पोलीस म्हटले की, तापट स्वभावाची असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसात असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ‘डय़ुटी’ बजावणारा पोलीस हा सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना असतात, याचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. समाजात घडणाऱया अनेकविध घटनांकडे पोलीस सुद्धा तेवढय़ाच सजगता, आपुलकीने पाहात असतात. आगामी चित्रपट ‘लालबत्ती’ हा पोलिसांतील याच पैलूवर प्रकाशझोत टाकणार आहे.

26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याचदिवशी ‘लालबत्ती’ प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिनेता मंगेश देसाई यांच्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता अजून वाढली आहे. आपल्या या हटके भूमिकेबाबत बोलताना मंगेश देसाई सांगतात की, प्रत्येक कलाकार खास अशा कलाकृतीच्या शोधात नेहमीच असतो. ‘लालबत्ती’ सिनेमाच्या निमित्ताने मला एका कर्तव्यकठोर तरीही अतिशय संवेदनशील अशा पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारायला मिळणे हे नक्कीच समाधानकारक आहे. या भूमिकेसाठी मी खास ठाण्याच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चे खडतर ट्रेनिंग घेत भूमिकेसाठी आवश्यक असणाऱया बऱयाच गोष्टी शिकून आत्मसात केल्या आहेत. या चित्रपटात मंगेश देसाई यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. ‘साई सिनेमा’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे.

Related posts: