|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचे अपहरण; पोलिसात तक्रार

पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचे अपहरण; पोलिसात तक्रार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी-काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या ड्राव्हरचे मुंबईतून अपहरण झाले आहे.

मनोज सातपुते असे या ड्रायव्हरचे नाव आहे. सातपुते यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी कुलाबा येथे उभा असताना ओमनी व्हॅनमधून काही लोक माझ्याजवळ आले. पार्थ पवार यांना भेटायचे आहे. त्यांच्याकडे आम्हाला घेऊन चल म्हणून मला ओमनीमध्ये बसवले. त्यानंतर काही वेळात मी बेशुद्ध पडलो. शुद्ध आली तेव्हा मी अहमदनगरच्या पारनेरमधील सुपे येथे होतो. पुणे-नगर महामार्गावरील सुपे येथे रस्त्याच्याकडेला या लोकांनी मला सोडले. शुद्धीवर आल्यावर मी पुणे जिह्यातील सणसवाडी या माझ्या गावी गेलो आणि दुसऱया दिवशी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सातपुते यांनी म्हटले आहे. याबाबचा अधिक तपास पोलीस करत आहेत.