|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » खडवली येथून 20 जणांची एअरलिफ्टद्वारे सुटका

खडवली येथून 20 जणांची एअरलिफ्टद्वारे सुटका 

ऑनलाईन टीम / ठाणे :

मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. ठाणे आणि पालघर जिह्यातही पावसाचा कहर सुरूच असून, ठाणे जिह्यातील खडवली येथे पुराच्या पाण्यात 25 जण अडकले होते. त्यापैकी 20 नागरिकांना एअरलिफ्ट करून ठाण्यातील कोलशेत एअरबेस येथे आणण्यात आले आहे. इतर नागरिकांच्या सुटका करण्यासाठी हॅलिकॉप्टर पुन्हा रवाना झाले आहे.

ठाणे जिह्यातील उल्हास, बारवी आणि भातसा नद्यांना पूर आला असून आसपासचा परिसर पाण्याखाली गेला आहे. तर पालघर जिह्यातील वसईतील मिठागार परिसरात अंदाजे 400 कुटुंब अडकली आहेत. एनडीआरएफच्या टीम त्यांच्या बचावासाठी कार्यरत आहेत. नद्यांकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts: