|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » पालघरमध्ये एसटी अपघातात 52 जखमी

पालघरमध्ये एसटी अपघातात 52 जखमी 

ऑनलाईन टीम / पालघर :

वाडा येथे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास वाडा आगाराची वाडा-पिवळी एम एच 14 बीटी 2331 या क्रमांकाची एसटी पिवळीहून वाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. बसमधून 52 प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतरांवर वाडा येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाला.

Related posts: