|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » तरच पुढची पिढी संगीत क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरू शकेल : पं. सुरेश तळवलकर

तरच पुढची पिढी संगीत क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरू शकेल : पं. सुरेश तळवलकर 

पुणे / प्रतिनिधी : 

संगीत क्षेत्रात स्वतःची प्रत्येक इच्छा आपण स्वतः पूर्ण करू शकत नाहीत. परंतू ती आपल्या शिष्याकडून पूर्ण करून घेता येवू शकते. आपला शिष्य चांगला तयार झालाच पाहिजे, हीच दृष्टी प्रत्येक गुरुने ठेवल्याने आजही गुरु-शिष्य परंपरा अखंडीत सुरु आहे. हीच परंपरा शिष्यांनी त्यांच्या शिष्यांकडे हस्तांतरीत करावी तरच पुढची पिढी संगीत क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरू शकेल, असा आशावाद पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केला.

तालयोगी आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरु अभिवादन सोहळय़ाचे’ आयोजन कोथरूडमध्ये करण्यात आले होते. यावेळी पं. उल्हास कशाळकर, पद्माताई तळवलकर, कथ्थक नृत्यांगना शमा भाटे, श्रीनिवास राव, सत्यजित तळवलकर आदी उपस्थित होते.

 

Related posts: