|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » राष्ट्रवादीला धक्का : दिडोरीचे माजी आमदार महाले यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का : दिडोरीचे माजी आमदार महाले यांचा शिवसेनेत प्रवेश 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दिग्वजियानंतर महाराष्ट्रातील विरोध पक्षांना लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे काही आमदार व नेत्यांनंतर आता दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. महाले यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाले हे नाशिक जिह्यातील दिंडोरीचे माजी आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्यानं त्यांनी पक्षांतराचा मार्ग चोखाळल्याचं बोललं जातं. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडं आहे. त्यामुळं महाले यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महाले हे पूर्वी शिवसेनेतच होते. ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.

 

Related posts: