|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कांदा वांदे करण्याच्या तयारीत

कांदा वांदे करण्याच्या तयारीत 

प्रतिनिधी/ बेळगाव

पूरस्थिती, शेत शिवारात साचलेले पाणी यामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात काद्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे बेळगाव एपीएमसी मार्केटमधील कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळे प्रतिकीलो कांद्याचा दर 22 ते 28 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. प्रतिक्विंटल 2800 ला पोहोचलेला कांदा पुढे प्रतिकिलो 50 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्मयता असून सर्वसामान्य नागरिकांचे वांदे होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

होलसेल बाजारपेठेत कांदा दाखल होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पाणी वाढुन पुणे-बेंगळूर महामार्ग बंद झालेला असताना कांद्याचा दर 3500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाऊन पोहोचला होता. महामार्ग खुला झाल्यानंतर काही प्रमाणात आवक वाढल्याने हा दर 1700 ते 1800 रुपये क्विंटल इतका होता. सध्या त्यात पुन्हा वाढ झाली. यामुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा दर वाढत चालला आहे.

काही व्यापाऱयांनी कांद्याची साठेबाजी करुन दरवाढ होण्याची प्रतिक्षा चालविली असल्याची माहिती मिळाली आहे. साठेबाजी होवू नये व दर नियंत्रीत रहावेत या दृष्टिने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

Related posts: