|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ख्रिश्चन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

ख्रिश्चन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा 

ख्रिस्ती समाजाच्या मिळकती अवैधरित्या बळकावणाऱयांवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हय़ात ख्रिस्ती बांधवांच्या ट्रस्टच्या मिळकती आहेत, त्या अवैधरित्या संगनमत करून बळकावल्या जात आहेत. अशांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी दी कोल्हापूर चर्च कौन्सीलच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन धर्मियांनी मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

चर्च कौन्सीलच्या नेतृत्वाखाली न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च येथून मुकमोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात हजारांहून अधिक ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. मुकमोर्चा दाभोळकर कॉर्नर चौकातून, रेल्वे स्टेशनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. मोर्चाची सांगता नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च येथे झाली.

कोल्हापूर चर्च कौन्सील, कोडोली ख्रिश्चन प्रेसव्हिटेरीयन चर्च, प्रांतपाल यांनी मुकमोंर्चाचे आयोजन केले. मुकमोर्चात रेव्हरंड जे. ए. हिरवे, बिशप बी. आर. तिवडे, रेव्हरंड श्रीनिवास चोपडे, उदय विजापूरकर, रेव्हरंड सुखानंद रणभिसे, रेव्हरंड आर. आर. मोहिते, शमुवेल गायकवाड, संदीप थोरात, सुशील अष्टेकर, सचिन थोरात, मॅगमन समुद्रे, आशुतोष आवळे सहभागी झाले होते.

निवेदनात कोल्हापूर चर्च कौन्सील अंतर्गत विविध मालमत्ता आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील या मालमत्तांचा वापर समाज कार्यासाठी केला जात आहे. चर्चची पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली येथील मिळकत 53 एकरांइतकी आहे. तेथे हॉस्पिटल, शाळा, हॉस्टेल, धर्मगुरू, कर्मचाऱयांची निवासस्थाने आहेत. 1978 मध्ये त्याचे सातबारा उतारे झाले. 1980 मध्ये त्यांची प्रॉपर्टीकार्ड झाली. पण सातबारा उतारे रद्द झालेले नाहीत. त्याचा गैरफायदा घेत काहींनी या मिळकती बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्या आहेत, या मिळकतींवर पुर्ववत ट्रस्ट, चर्चचे नाव लावावे, अशी मागणी केली आहे.

Related posts: