|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वर्षभर रखडलेल्या वाशिष्ठी पुलाचे काम सुरू

वर्षभर रखडलेल्या वाशिष्ठी पुलाचे काम सुरू 

चिपळूण / प्रतिनिधी :

वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणातील सर्वात मोठय़ा वाशिष्ठी नदी पुलाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढील पावसाळय़ापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू होईल, या दृष्टीने  पुलाचे काम वेगाने हाती घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

महामार्ग चौपदरीकरणातील बहुतांशी पुलांच्या कामाना प्रारंभ झाल्यानंतर मुख्य ठेकेदार आणि पोटठेकेदार यांच्यातील वादामुळे वर्षभराहून अधिक काळ ती थांबली होती. सुमारे 70 टक्के कामे पूर्ण झाले असल्याने शिल्लक 30 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी तीनवेळा निविदा काढल्या गेल्या. मात्र एकाही कंत्राटदार कंपनीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंपन्यानाच या पुलांची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम चेतक कंपनीकडे आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून या वाशिष्ठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.  पुलाच्या कामात वापरण्यात आलेले लोखंड गंजून गेल्याने ते काढून टाकण्यात आले आहे. वाशिष्ठी नदीवरील पुलाची लांबी 248 मीटर असून रूंदी  80 फूट असणार आहे. 40 फूट रूंदीचे दोन पूल असणार असून सहापदरीच्या दृष्टीने त्याची आखणी आहे. दोन्ही पुलांवर येणाऱया-जाणाऱयांसाठी दुतर्फा प्रत्येकी तीन फुटाचे फूटपाथ असणार आहेत. विशेष म्हणजे सध्या मोठे पूल, मेट्रो यामध्ये ज्या प्रेसिंग केबलचा वापर केला जातो, त्याच केबलचा या पुलामध्ये वापर केला जाणार आहे.

.

Related posts: