|Thursday, February 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार फत्तेशिकस्त

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार फत्तेशिकस्त 

बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा हा आपल्या संकटांचे निवारण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येकाचे विघ्न दूर करणारा हा विघ्नहर्ता प्रत्येकाचा आवडता आहे. याच बाप्पाभोवती फिरणारी कथा आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून समोर येणार आहे. या चित्रपटाचा गमतीशीर आणि तितकाच उत्साहवर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. गरिमा प्रोडक्शन्स्ची प्रस्तुती असलेल्या सन ऑफ सरदार आणि अतिथी तुम कब जाओंगे या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा आप्पा आणि बाप्पा हा पहिलाच मराठी चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सभोवतालच्या परिस्थितीची जाण करवून देत हा बाप्पा गोविंद कुलकर्णी म्हणजेच आप्पाच्या आयुष्यातील विघ्ने कशी दूर करणार? याची रंजक कथा या चित्रपटात मांडली आहे. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता आणि त्यातून होणारी सर्वसामान्यांची कोंडी यावर मार्मिक पण तितकाच परखड प्रकाशझोत या चित्रपटातून टाकला आहे. याप्रसंगी उपस्थित प्रत्येक कलाकाराने गणपती बाप्पासोबतचे आपले नाते सांगताना आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा हा विघ्नहर्ता साद घालणाऱया प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून येतोच हे आवर्जून सांगितले. भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे, उमेश जगताप आदी कलाकार या चित्रपटात आहेत.

गरिमा धीर आणि जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोडय़ूसर अजितसिंग आहेत.

 

स्वराज्यातील स्त्रीशक्ती

 शत्रूला देणार फत्तेशिकस्त

फर्जंद या ऐतिहासिक चित्रपटात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या आगामी मराठी चित्रपटात स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइक पहायला मिळणार आहे. आजवरच्या बऱयाच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळय़ांवर स्त्रियांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. फत्तेशिकस्त चित्रपटातही स्त्राrशक्तीचे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेत, तर काहींनी पडद्यामागे राहून आपले कौशल्य पणाला लावत फत्तेशिकस्त पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

चतुरस्र अभिनेत्री मफणाल कुलकर्णी या चित्रपटात पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. छोटय़ा पडद्यावर आणि मोठय़ा पडद्यावर यापूर्वी राजमाता साकारल्यानंतर त्या पुन्हा यात जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतिहास घडविणाऱया या राजमातेचं लढवय्ये रूप या चित्रपटात पहायला मिळेल. या सोबत अभिनेत्री मफण्मयी देशपांडे फुलवंती या एका वेगळय़ा ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रुची सावर्ण दिसणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी रुची सावर्ण फत्तेशिकस्तमधून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. मोगल साम्राज्याची बडी बेगमची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने रंगवली आहे. मोगल साम्राज्यातील वफादार सरदार रायबाघनच्या भूमिकेत अभिनेत्री तफप्ती तोरडमल तर शाहिस्तेखानाची सून बहूबेगमच्या भूमिकेत नक्षत्रा मेढेकर दिसणार आहे. या साऱयांनी साकारलेल्या या ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्मरणात राहणाऱया ठरणार आहेत.

पडद्यावर दिसणाऱया या अभिनेत्रींच्या जोडीला पडद्यामागे राहून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम करणाऱया डीओपी रेशमी सरकार यांनी छायांकनाची जबाबदारी चोख बजावली आहे. शिवकालीन गड-किल्ल्यांच्या जोडीला स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइकही प्रेक्षकांना त्यांच्या नजरेतून पाहायला मिळणार आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्राण असणारी वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी, तर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. या दोघींनीही अतिशय कल्पकतेच्या बळावर स्वराज्यातील व्यक्तिरेखांना गेटअप आणि मेकअप केला आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर ‘फत्तेशिकस्त’चे निर्माते आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्कर्ष जाधव यांनी सांभाळली आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिले असून गीतरचना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. 15 नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Related posts: