|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » शेतकऱयांना दिवाळीचा बोनस

शेतकऱयांना दिवाळीचा बोनस 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो शेतकऱयांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील सहा हजार रुपयांच्या रकमेसाठी नोव्हेंबरपर्यंत आधार क्रमांक लागणार नसल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे स्पष्ट केले.

शेतकऱयांचे पैसे आधारमुळे थांबणार नाहीत. रब्बीच्या पिकासाठी शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे. यासाठी स्वतः शेतकऱयांना पोर्टलवर जाऊन त्यांचे नाव व आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. अशा प्रकारे आतापर्यंत पाच लाख शेतकऱयांची नावे नोंदवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: