|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » उद्योग » दोन भारतीयांनी फॉर्च्यूनच्या यादीत पटकावले स्थान

दोन भारतीयांनी फॉर्च्यूनच्या यादीत पटकावले स्थान 

अमेरिकन फॉर्च्यूनमध्ये 40 युवाचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगझीन फॉर्च्यूनने बिजनेस वर्ल्डमध्ये 40 वयापेक्षा कमी वय असणाऱया 40 लोकांची(40 अंडर 40) फॉर्च्यून यादी सादर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत 2 भारतीय युवाना स्थान पटकावण्यात यश मिळाले आहे.

सादर केलेल्या यादीत  अर्जुन बन्सल आणि अंकिती बोस यांचा समावेश आहे. बन्सल टेक्नॉलॉजी फर्म इन्टेल व्हाईस अध्यक्ष (आर्टिफिशअल इंटेलिजेन्स सॉफ्टअवेअर ऍण्ड एआय लॅब) तर अंकिती फॅशत प्लॅटफॉर्म जिलिंगोच्या सीईओ आणि सहसंस्थापक आहेत.   यामध्ये अंकिती बॅकॉक बाजारात स्टार्टअपची आयडिया घेऊन आली होती. तिचे सध्या वय 27 वर्ष असून ती चार वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली होती. दुसऱया बाजूला 35 वर्षांचे बन्सल यांच्याकडे 100 जणांची कर्मचारी वर्ग आहे. यात अमेरिका, इस्रायल आणि पोलंड आदी ठिकाणी काम करत आहेत. बन्सल हे कृत्रिम बुद्धीमत्ता यावर काम करत आहेत.