|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » कर्नाटक : माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संस्थांवर आयकर विभागाच्या धाडी

कर्नाटक : माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संस्थांवर आयकर विभागाच्या धाडी 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर आयकर विभागाने धाडी घातल्या आहेत. तसेच काँग्रेसचे माजी खासदार आर. एल. जलप्पा यांचे चिरंजीव जे. राजेंद्र यांच्याही संस्थांवर आयकर विभागाने धाड टाकली. दोन्ही ठिकाणांहून आयकर विभागाने तब्बल 4.52 कोटींची रोकड जप्त केली आहे.

जी. परमेश्वर यांचे कुटुंब सिद्धार्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स चालवतात. त्यांचे कार्यालय, निवासस्थान आणि संस्थांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. ट्रस्टच्या वतीने चालवल्या जात असलेल्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांनी नीट परीक्षा घेण्यात केलेल्या अनियमिततांच्या चौकशीचा या धाडी एक भाग आहे. आतापर्यंत टाकलेल्या धाडीत तब्बल 4.52 कोटी रक्कम जप्त करण्यात आली आहे. नीट परीक्षात बनावट परिक्षार्थी बसवणे आणि जागा सुरक्षित राहाव्या यासाठी बेकायदा पैसे देण्याचा व्यवहार हा कारवाईमागे आहे.

तसेच राजेंद्र हे आर. एल. जलाप्पा इन्स्टिटय़ूशन ऑफ टेक्नॉलॉजी चालवतात. नीट परिक्षांशी संबंधीत कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याच्या संशयावरून परमेश्वर आणि इतर ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या 300 पेक्षा जास्त कर्मचाऱयांनी या धाडी घातल्या आहे. या धाडीत तब्बल 4.52 कोटी रक्कम जप्त करण्यात आली आहे.